Friday, March 18, 2011

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या

परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क् तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...

तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...

Tuesday, March 8, 2011

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?


कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो

आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.


मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?

तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?


मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा

आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी

ईतकेच मनाला समजावतो।
हो मला प्रेम कधी जमलेच नाही
तिच्या शिवाय मन माझ कशात रमलच नाही!१!

माझ्या मनात
सारखा तिचाच विचार
तिच्या, मात्र मित्रांशी
फोनवर गप्पाच फार!२!

तिला हसवण्यासाठी करायचो
मी जीवाचे रान,
ती म्हणते कशाला देतोस
मला फुकटचा त्राण!३!

तिला खरचटले तरी
व्हायचा हृदयावर घाव,
ती म्हणते कशाला आणतोस
चेहऱ्यावर काळजीचा आव!४!

फोन करायचो तिला
वाटायची तिची काळजी,
ती म्हणते परीक्षा असून फोनवर बोलतोस
असा कसा तू निष्काळजी!५!

तिला सांगायला गेलो
माझे आहे तुझ्यावर प्रेम,
ती म्हणते तुझे नाही का
आयुष्यात कोणते aim!६!

तिला वाढदिवसाला भेटायला गेलो
भर उन्हात तापत,
ती म्हणते, मी मित्राच्या
घरी आहे केक कापत!७!

३वर्षे झाली आज, मी
गुजरातला नोकरी करत आहे,
माझ्या प्रेमाशिवाय मी
एकाकी जीवन जगात आहे!८!

काल आठवण आली म्हणून
तिच्या घरी रिंग केली,
तिच्या आईकडून मला
वेगळीच बातमी कळली!९!

मी जायच्या दुसरया
दिवशीच ती आजारी पडली,
अन माझ्या विरहाच्या
तीव्र दुखानेच देवाघरी गेली!१०!

तिचे अव्यक्त शब्द कळलेच नाही
तिच्या मनातील भाव ओळखलेच नाही
तिच्या डोळ्यातील प्रेम जाणलेच नाही
म्हणून, मला प्रेम कधी जमलेच नाही!११!
मला प्रेम कधी जमलेच नाही!११!

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी.

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे.

पण,पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसाव
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा.

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी.

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी.

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे.

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे।

ती वाट चुकीचीच होती ...
तू दाखवलेली वाट अंधाराची होती
पण विश्वासानेच मी ती धरली होती ...

मार्ग तसा आपला एकचं होता
पण नशिबाचा बेत काहीसा वेगळा होता ...

मनात नसतानाही तुझ्यासोबत तेव्हा हसले होते
कदाचित इथेच नशिबाचे चाक माझे फसले होते ...

दूर पर्यंत सोबत करशील हा विश्वास होता
पण त्या अंधारात तू नकळत दूर जात होता ...

एका वळणावर जेव्हा मी वळून पहिले होते
माझ्या भासाशिवाय दुसरे काहीही दिसले नव्हते ...

ती अस्पष्टशी प्रतिमा कदाचित तुझीच होती
पण आसवांच्या पडद्याआड तीही धुसारशी होत होती ...

आर्त मन माझे तुलाच साद देत होते
पण ते ऐकायला तुझे अस्तित्वच तिथे उरले नव्हते ...

आता थांबवूनही काही उपयोग नव्हता ... तुझी वाट तू निवडली होती
कुणास ठाऊक !! कदाचित माझीच वाट चुकीची होती ...

भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!

कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!

महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!

मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!

थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!

तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये........