Thursday, August 13, 2020

 

मुलगा परदेशात त्याच्याकडे भरपूर पैसे असून देखील, पहा या आई वडिलांची अवस्था कशी झाली..

 चला कथेला सुरवात करू, “काही आणायचे आहे का मॅडम..? मी खाली उतरतोय….” त्याने कापडी पिशवी हातात घेत कोपऱ्यातील चपला पायात घालत विचारले. “आता कशाला जाताय खाली.? माहितीय ना काय चालू आहे…? उगाच रोगाला आमंत्रण..” तिने त्रासून म्हटले. “मग काय करू मॅडम….?? काल पासून दूध नाही. साखर तर कमी लागते आपल्याला त्यामुळे त्याचे टेन्शन नाही. डायबेटीस असल्याचा काय फायदा असतो हे या रोगाने जाणवून दिले आपल्याला..” तो हसत म्हणाला.

“होईल हो सर्व काही व्यवस्थित…. आजचा दिवस दुधाची पावडर वापरू.. उद्या कोरा चहा पिऊ.. तोपर्यंत काहीतरी होईल….” ती म्हणाली. “हो ना…जुने दिवस आठवले बघ .. तेव्हा दुधाच्या बाटल्या मिळायच्या केंद्रावर . आपली तर ऐपत नव्हती . मग जाधवांकडून एक रुपयांचे दूध आणून चहा करायचो . आणि एक रुपयाचा बिस्कीटचा पुडा आणून पोराला द्यायचो.दूध त्यांच्या चहातच संपून जायचे आणि आपण कोरी चहा प्यायचो….” तो जुन्या आठवणीत रमला. “आणि हो…. रात्री अमितचा व्हिडिओ कॉल येईल त्याला हे सांगत बसू नका.. आणि ती दाढी करून घ्या हो आधी.. किती गबाळे दिसतायत तुम्ही.. काल बोललाच तो.. पप्पा कसे रहातायत..? ती थ्री फोर्थ.

कशी आणि टी शर्ट ही जुना…” ती ओरडली. “ओ बाई.. माहितीय ना.. इथले सलून बंद आहेत ते, मी घरी दाढी करत नाही हे चांगले माहीत आहे त्याला, म्हणून तो किटही पाठवून देत नाही. त्या नेहमीच्या सलूनवाल्याच्या अकाउंटवर पैसे पाठवितो आठवणीने, आणि कपड्याचे काय ग….? हल्ली कुठे बाहेर जातो आपण…? आणि तुला तर कपडे धुवायला जमत ही नाही..” त्याच्या बोलण्यात वेदना होती. “सगळं मान्य आहे.. पण तिकडे त्याला का त्रास द्यायचा.. किती करतो तो आपल्यासाठी, दर महिना रेशन.. गरजेच्या वस्तू दारात येतात. कामवाल्या बाईला वेळच्या वेळी पगार, डॉक्टरची बिल आपल्या गोळ्या… सर्व काही व्यवस्थिती मॅनेज करतो ते ही परदेशात राहून…. आहो.

त्या गोळ्यांवरून आठवण झाली.. या दोन दिवसात तुमच्या गोळ्या संपतील, आठवणीने घेऊन या….” ती कपाळावर हात मारून म्हणाली. “आणि तुझ्यातर अजून महिनाभर चालणारच आहेत नाही का..? कालच रिकामी पाकिटे पाहिली मी.. आणि म्हणूनच खाली चाललोय आणायला.. त्या मेडिकल वाल्याकडे काही खायला असेल तर तेही घेऊन येतो….” तो डोळे मिचवकात म्हणाला. “आहो…. आपला अमित ठीक असेल ना..? आपल्या इथे इतकी गडबड चालू आहे, तिथे तर बघायलाच नको. रोज शंभरावर माणसे मरतायत, ते सर्व रोज बोलतात आपल्याशी पण चेहऱ्यावरची काळजी काही लपत नाही त्यांच्या….” ती अश्रू टिपत म्हणाली. “सरकार…. त्याला स्वतःची.

काळजी नाहीय तर आपली काळजी आहे. इथे सर्व लॉकडाऊन आहे. कोणी कोणाकडे जात नाही. आपली कामवाली येत नाही. दूधवाला येत नाही. हे सर्व माहीत आहे त्याला.. आणि तिथे राहून खिश्यात बक्कळ पैसे असूनही काहीही करू शकत नाही याचे दुःख आहे त्याला…. म्हणून तुम्हाला सांगतो हसत खेळत बोला त्याच्याबरोबर..” तो आता गंभीर झाला. “ठीक आहे.. मग आज मस्त हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जाऊ त्याला.. मी तुमच्यासाठी आज छान ड्रेस काढून ठेवते. पण तुम्ही आज खाली जाऊ नका प्लिज.. “ती अगदी गोड आवाजात म्हणाली. “हाय.. हाय..!! इसी अदा पर तो हम फिदा हुये थे.. लग्नाआधी असाच एकदा बिल्डिंगखाली आलो होतो तुला भेटायला.. तेव्हाही तू.

असेच म्हटले होतेस आणि तेव्हाही मी थांबलो थोडा वेळ.. परिणाम कांय झाला माहितीय ना….? तुझ्या बापाने कानाखाली काढलेला जाळ अजून चटका देतोय….” तो गालावर हात ठेवून नाटकी आवाजात म्हणाला. “इतके ही नको हो कुजकट बोलायला… तरीही लग्न केलेच ना शेवटी तुमच्याशीच…. ते राहू दे आज मी तुमची दाढी करते.. माझ्याकडे हेयर रिमूविंग क्रिम आहे. त्यानेच करू….” ती ताठ मान करून म्हणाली. काय क्रिम..? हे कधी आणलेस तू..? आणि तुझे वय आहे का हे….”? तो थोडा चिडून म्हणाला. “गप बसा हो.. मागे सुनबाई आली होती तेव्हा तिचा मेकअप बॉक्स इथेच ठेवून गेली माझ्यासाठी, आई वापरा तुम्ही छान दिसाल अशी म्हणाली.मग मीही ठेवून घेतला. त्यात हे होते.

आज तेच वापरू मस्त दाढी करूया तुमची….” ती टाळी वाजवत म्हणाली. मान डोलवत तो हताशपणे तिच्यासमोर जाऊन बसला. संध्याकाळी दोघेही तयार होऊन त्याच्या विडिओ कॉलची वाट पाहत बसले. त्याचा कॉल आला आणि आईवडिलांना इतके टापटीप बसलेले पाहून तो खुश झाला. त्याने हळूच मुलाला थांब अशी खूण केली. मग आत जाऊन ओवाळणीचे तबक आणले आणि तिला ओवाळले, मग ती उठली आणि त्याला ओवाळले मुलगा हे सारे स्क्रिन वर पाहत होता. त्याने आश्चर्याने विचारले.. “हे काय..”? “अरे.. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही का..? तो ही एकोणपन्नासावा.. नेहमी शेजारी आणि नातेवाईक येतात शुभेच्छा द्यायला पण या लॉकडाऊन.

मुळे कोणाच्या लक्षात आलेले दिसत नाही. नेहमीचे फोन आठवणीने आले तेव्हढेच पण हा दिवस साजरा करायला हवाच आज आम्हीच एकमेकांना ओवाळणार.. एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार….” तो हसत हसत मुलाला म्हणाला. तिने ही अलगद डोळे पुसले. “माफ करा बाबा.. या परिस्थितीमुळे मला तुमच्यासाठी काहीच करता येत नाही. पण एक वचन नक्की देतो. तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आपण झोकात साजरा करू. त्यावेळी मी विडिओ कॉल करणार नाही तर प्रत्यक्ष हजर असेन कदाचित पुढचे सर्वांचे वाढदिवस आपण एकत्रच साजरे करू.. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कथा वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी नवऱ्याने गिफ्ट म्हणून असे काही दिले की, ते पाहून मुलीच्या वडिलांना अटॅक आला..

त्यात भरीस भर म्हणून ती हसल्यावर काळजावर वार करण्यासाठी दोन्ही गालांवर लक्ष वेधून घेणाऱ्या खळ्या स्वार होत्याच . निसर्गाने इतकं भरभरून सौंदर्य दिल होतं की त्यापुढे कृत्रिम प्रसाधने सुद्धा फिकी पडतील. पण इतकं सगळं असूनही माणसाचं दुर्दैवापुढे काही चालत नाही हेच खरं, दर शनिवारी सकाळी सात वाजता मुंबई हुन डेक्कन क्वीन पकडायची आणि साधारण अकरा, सव्वा अकरा पर्यंत पुण्यात टच व्हायचं हा मानसीचा आता नित्यक्रम झाला होता. आज शनिवार, नेहमीप्रमाणे मानसी मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दक्खनच्या राणीत चढली, आज तिला तिच्या आवडीची खिडकी जवळची.

रिझर्व्ह सीट मिळाली, तिने आपलं सामान वरच्या रॅक वर ठेवलं आणि मग शांतपणे बसून निश्वास सोडला. थोड्याच वेळात ती रिलॅक्स झाली. ट्रेन मधे आजूबाजूला लोकांची चलबिचल त्यात, बिस्लरी, चहा, कॉफी विकणाऱ्यांची ये जा सुरू होती. लोक आपापल्या रिझर्व्ह सीट्स तपासून स्थानापन्न होत होते. तिने क्षणभर नजर फिरवली आणि पाहिले तिच्या आजूबाजूच्या सीट्स सुद्धा एव्हाना भरल्या होत्या, इतक्यात समोरच्या खिडकीत एक बऱ्यापैकी हॅण्डसम दिसणारा साधारण तीस बत्तीस वयाचा असा युवक येऊन बसला. त्याची आणि मानसीची क्षणभर नजरानजर झाली, आणि ती.

दुर्लक्ष करून खिडकीच्या बाहेर पाहू लागली. ट्रेन सुटायची वेळ झाली होती, रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांची तोबा गर्दी होती. मानसीच्या मनात सहजच विचार डोकावून गेला, या एवढ्या अनोळखी लोकांच्या गर्दीत मी सुद्धा एक अनोळखी. एवढ्या तुडुंब भरलेल्या गर्दीत कोणीच कसं आपलं नाही, गर्दीतही कीती एकटे असतो ना आपण? इतक्यात ट्रेन सुरु झाली आणि तिची विचारशृंखला तुटली. आज तिने केसांना जस्ट एक क्लिप लावून केस मोकळे सोडले होते, ट्रेनने जसा स्पीड पकडला मानसीचे केस वाऱ्यावर भुरभुरू लागले. तिने सुटसुटीत वाटावं म्हणून हात मागे घेऊन केसांना पीळ दिला व ती.

केसांना वर बांधणार इतक्यात, “असेच मोकळे राहू देत ना,खुप सुंदर दिसत आहेत”. मानसीने चमकून आवाजाच्या दिशेने पाहिलं तर समोरच्या युवकाच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं होत. तिने त्याचं न ऐकताच केस वर बांधले आणि त्याला विचारलं, “तुम्ही मला ओळखता का?”. तो युवक लगेच बोलला हो! तुम्ही मानसी कुलकर्णी ना, मी गंधार पुराणिक, आपण पुण्याला एकाच कॉलेज मधे होतो, मॉडर्न कॉलेज ऑफआर्टस, सायन्स अँड कॉमर्स तरीच! मला मघाशी वाटलंच तुम्ही मला ओळखलं नसाल” अस म्हणून त्याने मंद स्मित केलं. “सॉरी हा, मी खरंच ओळखलं नाही” मानसी थोडीशी वरमून म्हणाली.

“अरे..! इट्स ओके, त्यात काय, मला माहीत आहे, कॉलेज मधे असताना सुद्धा तुम्हाला इतर मुलींसारखी इथे तिथे बघायची सवय नव्हती,आपलं काम भल की आपण, कधी कोणाच्या अध्यात मध्यात नाही, वर मान करून कोणाकडे पाहणं नाही, मला तुम्ही खुप आवडत होतात, मी नेहमी शेवटच्या बेंचवर बसून तुम्हाला निरखायचो, मी खास तुम्हाला पाहण्यासाठीच कॉलेजला यायचो, तुम्ही तेंव्हा ही दिसायला खुप सुंदर होता आणि आजही खूप सुंदर दिसता.” तो इतकं घडा घडा सगळं बोलून गेला, अन मानसी पहातच राहिली, तिचा या गोष्टीवर विश्वासच बसेना, की कोणी आपलं इतकं कसं निरीक्षण.

करत होतं, तिला काय बोलावं हेच सुचेना, आश्चर्यमिश्रित बावचळलेल्या अवस्थेतलं तीच मनोमन लाजणं गंधारने त्याच्या तीक्ष्ण नजरेने बरोबर टिपलं, आणि त्यानेच तिला पुढे विचारलं. “मग, सध्या काय करता तुम्ही? कुठे असता? पुण्याला कोण असतं?” आता मात्र मानसी भानावर आली, तिच्या चेहऱ्यावरचाआनंद क्षणात नाहीसा झाला कोण हा? काय सांगू मी याला माझी दुर्दशा, लगेच स्वतःला सावरून, ती म्हणाली,मी मुंबईत सर्व्हिस करते, शनिवार, रविवार सुट्टी असते म्हणून पुण्याला घरी जाते. “अच्छा अच्छा, म्हणजे सासर , माहेर दोन्ही पुण्यातच , वा..!,छान, मग मिस्टर काय.

करतात,? तुझं लग्न झाल्या बद्दल कानावर आलं होत”. एकदम बोलता बोलता तो एकेरीवर आला, तुम्हीच तू झालं, का कुणास ठाऊक पण मानसीला तो जवळचा वाटला आणि तिने पटकन सांगून टाकलं,” माझा डिव्होर्स झालाय” गंधार एकदम चपापला, “सॉरी हा, मला माहीत नव्हतं. “मानसीने “इट्स ओके” बोलून मंद स्मित केलं. आणि ती खिडकी बाहेर उगीचच पळणाऱ्या निसर्गाकडे पाहू लागली. तेवढ्यात रेल्वेतला एक चहा वाला पानी कम चाय म्हणत पाणचट चहा घेऊन आला, गंधारने मानसीला विचारलं ,चहा घेणार का?. “नाही, नको, मला ट्रेन मधला चहा आवडत नाही” मानसीने निर्विकार.

उत्तर दिलं. उगीच टाळतेय असं वाटायला नको म्हणून तिने सहजचं गंधारला विचारलं, “तुम्ही काय करता , कुठे असता, मिसेस काय करते?” “मी पुण्यातचं एका इंटरनॅशनल कंपनीत, मॅनेजरच्या पोस्टला आहे, पुण्यातच रहातो, मुंबईला एका क्लाइंटशी मीटिंग होती काल म्हणून आलो होतो, अजून लग्न नाही केलं”, अगदी शांतपणे त्याने उत्तर दिल. “का? लग्न का नाही केलंत.” मानसीने आश्चर्याने विचारलं. “जी मुलगी आवडत होती, तिला कधी सांगूच शकलो नाही, आणि तिच्या नंतर कोणी आवडलंच नाही, गंधारने उत्तर दिलं. तुझा डीव्होर्स कसा झाला? “जाऊदे, इट्स लॉंग स्टोरी” अस.

बोलून मानसीने प्रश्न टाळला. “अग सांग, आपल्याला कुठे घाई आहे, प्रवास पूर्ण होईस्तोवर तुझं मन मोकळं होईल, आणि तसाही मी आता अनोळखी राहिलो नाही.” गंधारच्या बोलण्याने मानसीला आतुन भरून आलं, कितीतरी दिवसांनी कोणीतरी तिला आपुलकीने तिच्याबद्दल विचारत होत, तिला का कुणास ठाऊक त्याच्या समोर मन मोकळं करावस वाटलं आणि तिने सांगायला सुरवात केली, “माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते, आम्ही भावंड त्यांच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नव्हतो, ते म्हणतील ती पूर्व दिशा, त्यांनी त्यांच्या मित्राला शब्द दिला होता, माझं लग्न त्यांच्या मुलाशी करून देईन, आणि.

ठरल्याप्रमाणे तो पाळलाही, पण माझं लग्न झाल्यावर समजल की त्यांच्या मुलाने आधीच चोरून प्रेम विवाह केला होता, माझ्याशी लग्न केवळ व्यवहार होता, माझ्या वडलांकडून भरभरून हुंडा घेतल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी गिफ्ट म्हणून मला डीव्होर्स पेपर दिले, माझ्या वडलांना या सर्व प्रकारचा मोठा धक्का बसला, आणि हार्ट अटॅक येऊन ते देवाघरी गेले, भावाचं लग्न झालं, आई, भाऊ, वाहिनी एकत्र राहतात, मी मुंबईत कंपनीने एम्प्लॉयीस करता रूम घेऊन दिल्या आहेत तिथे राहते, शनिवार- रविवार आईला भेटून तोंड दाखवून येते, केवळ चांगली नोकरी आहे म्हणून पडीक.

नाही असं म्हणावं लागेल. “अशी आपली कर्मकहाणी थोडक्यात सांगून मानसीने दीर्घ श्वास सोडला.सगळं शांतपणे ऐकून झाल्यावर गंधार इतकंच म्हणाला,” जी मुलगी मला मनापासून आवडत होती ती तूच होतीस मानसी, “मागचं सगळं विसरून लग्न करशील का माझ्याशी?” गंधारचे हे शब्द ऐकताच मानसीला काय बोलावे सुचेना, अलवार तिच्या भावना दाटून आल्या आणि डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. मात्र तिने एक गोष्ट केली, मनोमन डेक्कन क्वीनचे आभार मानले कारण आज या डेक्कन क्वीनने मानसीला जन्माचा जोडीदार दिला होता…. मित्रांनो तुम्हाला हिच्या बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा पतीने पत्नीला तिच्या चारित्र्य विषयी प्रश्न विचारला.. तेव्हा पहा पुढे काय घडले

तिला तिच्या उतरत्या वयाची जाणीव करून देत असत, आणि मग सुरू होत असे आठवणींचा जीवघेणा प्रवास…. एखाद्या चित्रफितीप्रमाणे मेंदूच्या स्मृतिपटलावरून एक एक दृश्य पुढे पुढे सरकत जावी त्याप्रमाणे एक एक प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात असे. आईविना सरलेलं बालपण.., तारुण्य.., लग्न.., नवरा.., मुले.., व आतापर्यंतचा तिचा प्रवास.., काढलेल्या खस्ता सारं सार काही, पुन्हा नव्याने परिस्थिती आणि जबाबदाऱ्या माणसाला लहान वयातच प्रौढ बनवतात. सुधाचही असंच काहीस झालं. लहान वयातच आई गेल्यामुळे तिच्या संसाराची आणि लहान भावांची जबाबदारी सुधावर येऊन पडली.

त्यामुळे बालपणापासून ते तरुणपणाचा काळ कसा सरला हे तीच तिला देखिल कळलं नाही. ऐन तरुण्यातले फुलपाखराप्रमाणे बागडणारे दिवस कसे आणि कधी उडून गेले पत्ताच लागला नाही. वडीलांची आर्थिक परिस्थिती गरीब होती, त्यामुळे आहे त्यात समाधान मानून गुजराण करायची सवय होती तिला.. कधी कसले हट्ट नाही, कोड कौतुक नाही, इतर मुलींसारखं लाडे लाडे बोलायची सवय नाही, कोणी लाड करावे प्रेम करावे अशी अपेक्षा देखील नाही. त्यामुळे ती स्वतःही उमलत्या वयात कोणावर प्रेम करू शकली नाही. तिला कोणी आवडायच नाही असेदेखील म्हणता येणार नाही, आई गेल्यावर चाळी सारख्या ठिकाणी.

लोकांच्या घाणेरड्या नजरा सांभाळून तिने स्वतःला जपलं होत, हे बाहेरच जग वाईट आहे, इथे मुले मुलींना पळवून नेऊन फसवतात, त्यात आपल्याला आई नाही, वडील साधे भोळे गरीब त्यामुळे कोणी फसवलं तर..?, असा विचार करून कधी कोणाच्या प्रेमात वगैरे पडायचं नाही असा निर्णय घेऊन तिनेच स्वतःवर बंधने लादून ठेवली होती. त्यानंतर रीतसर लग्न करून, नवरा मुले, नोकरी यातच तिने स्वतःला झोकून दिल होत. आणि आता या उतरत्या वयात तिला जाणीव होत होती की घर, दार, मुले, आपलं सगळं व्यवस्थित असून सुदधा काहीतरी कमी आहे, खुप काही निसटून गेलंय, कसलं हे अपूर्णत्व…. सगळ्यांनी.

आपला फक्त वापरच करून घेतला की काय? कोणीच आपल्यावर कधी प्रेम नाही केलं, आपण मात्र सगळ्यांसाठी राबत राहिलो. लोक म्हणतात ते खरंच आहे की, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता असते, तिला समज आल्यापासून ती कधी भाऊ, बहीण, आई, वडील, तर कधी नवरा, मुले, सासू-सासरे यांची आई बनून जाते…. तिच्यातलं सार सार मातृत्व, प्रेम ती आपल्या माणसांवर बरसवत राहाते. प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्यात तिची आई व पती या दोन व्याक्तिकडूनच प्रेमाच्या अपेक्षा असतात. ते जर तिला नाही मिळालं तर सर्व असूनही ती आतून एकटी असते. सुधालाही आता अशीच काहीशी.

जाणीव होत होती. ‘पुष्कर’ सुधाचा पती…. एक शिक्षित, निर्व्यसनी, मेहनती, जबाबदार पुरुष , दिवसरात्र कष्ट करून, त्याने आणि सुधाने मुलांसाठी त्यांच्या परीने खुप काही केलं होतं, करत होते, सगळंच तर छान चालू होतं . पण तरीही सुधाला त्यांच्या नात्यात एक अंतर जाणवत होत. त्यांच्या आवडीनिवडी, विचार, स्वभाव, सगळंच अगदी भिन्न होतं. पुष्कर काळजी तर व्यवस्थीत घेत होता, घरासाठी, मुलांसाठी सगळं करत होता, मग अस काय होत जे सुधाला खटकत होत. खरं तर या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडेही नव्हतं. आज लग्नाला पंचवीस वर्ष होऊन सुद्धा सुधाला पुष्करच्या नजरेत, स्पर्शात कधी प्रेम.

आपलेपणा, हळुवारपणा भासला नव्हता. त्याच्या स्पर्श तिला नेहमीच कृत्रिम जाणवायचा. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या मनात सं भो गा बद्दल भीती निर्माण झाली होती, त्याला कारणही तसच होत, अगदी दहा वर्षाची असताना तिच्या आजोळी जाताना तिने आईला शेवटची मिठी मारली होती, त्यानंतर तिची आई तिला न भेटताच देवाघरी गेली. तीच लग्न झाल्यावर प्रथमच इतक्या वर्षांनी तिला एका परपुरुषाचा स्पर्श होणार होता. लहानपणी आईने वि व स्त्र पाहिल्यावर आज तिचा पती तिला पाहणार होता. हनिमून बद्दल मैत्रिणीं कडून ऐकलं तेवढच माहीत होत, पण प्रत्यक्षात सगळं वेगळच घडलं.

पुष्करचा आततायीपणा, आक्रमक वागणं, लाज, संकोच, भीती यामुळे ती पुष्करला सहयोग नाही देऊ शकली, तो जवळ आल्यावर तीचा चेहराच घाबरून पां ढ रा पडायचा, भीतीने तीच शरीर ताठ व्हायचं, ती त्याला जवळ येऊ देत नव्हती, आणि मग तो चिडून दूर निघून जायचा, त्याच्या तापट स्वभावामुळे तो तिला समजून घेऊ शकत नव्हता. त्याने तिला भलतेच प्रश्न विचारले , तुझ्यावर ब ला त्का -र झाला होता का?, कोणी तुझा गै र फा य दा घेतला होता का?, तिला वाटू लागले तिच्यातच दोष आहे, कदाचित तिलाच इतर मुलींसारखं वागता येत नाही, पण हळू हळू कालांतराने, जेंव्हा त्यांचा प्रथम सं भो ग झाला तेंव्हा त्याचा.

गैरसमज आपोआप दूर झाला, त्याला कळून चुकल, की अस काहीही नाही, हळू हळू सगळ सवयीचं होऊन गेलं, मुले झाली, मुले थोडी मोठी झाली, सुधा आणि पुष्करच्या जबाबदाऱ्या वाढल्या कामे वाढली आणि दुरावा सुद्धा.. मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

संसाराचा गाडा पुढे ढकलण्याचा नादात हिने अखेरचा श्वास घेतला, परंतु हिचा नवरा अजून….

 नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. तर चला कथेला सुरवात करू रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करून सई झोपण्यासाठी बेडरूममध्ये आली.. रात्रीचे 12.15 झाले होते. मोबाईल हातात घेऊन दिवस भरचे मेसेज सरकवत राहिली. बाजूला समीर म्हणजेच सईचा नवरा मोबाईल घेऊन बसला होता. सई- “समीर उद्या सकाळी मला लवकर ऑफिसला जायच आहे,तर प्लीज मला सोडणार का स्टेशन ला..” समीर- “नाही हा सई माझी उद्या सुट्टी आहे.

तर मी उद्या उशीरा उठणार आहे.. तु जा ना रिक्षा ने.. मला आराम करायचा आहे.” सई- “अरे पण सकाळी लवकर कुणी नसत, मला भीती वाटते एकटीला रिक्षा मध्ये. तु आलास तर बर होईल”. समीर- (जोरात ओरडून)” एकदा सांगून समजत नाही का तुला? माझा उद्या Week off आहे मला माझी झोप मोड करायची नाही.” आणि हो एवढीच भीती वाटते तर सोडून दे नोकरी आणि बस घरी. किती पगार मिळतो ते माहित आहे.. सई- गप्पच… मोबाईल मध्ये 4.00 चा गजर लावून झोपी गेली.. सकाळ झाली गजर च्या आवाजात सुद्धा समीर भडकला.. सई काहीही न बोलता गजर बंद करून उठली. घरातील कचरा काढला.

फरशी पुसली. आंघोळ करून देवपूजा केली व किचनमधे गेली, सकाळच्या नाश्त्यासाठी कांदेपोहे, दुपारचे जेवण ( आमटी,भात, भाजी,पोळी)करून स्वतःचा डबा भरला..मगाशी दुध आणायला गेली होती तेव्हा गॅस वरची पोळी करपली होती. तिच करपलेली पोळी डब्यात टाकली. आणि डबा पर्स मध्ये ठेवला. घड्याळाच्याा काटया कडे पाहत भराभर आवरत ती एक एक काम उरकत होती. आता 6 वाजले होते. 5 मिनिटांत तिला आवरायचे होते.. बरोबर 6.05 मिनिटांनी तिने घर सोडले. घरापासून दूर चालत गेली तरीसुद्धा रिक्षा चा पत्ता नव्हता.. सारखे मागे पुढे पाहत ती चालत होती. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.. मनात.

भीती वाटत होती पण नोकरी सोडून जमणार नव्हते. ती तशीच चालत स्टेशनला पोहोचली. व ट्रेन पकडली. गर्दीत पुढे सरकत होती.. बसायला जागा नाही.. झोप सुद्धा येत होती.. प्रवास एक तासाचा होता.थोड्या वेळानं तिला एका महिलेने थोडी बसायला जागा दिली. ती लगेच बसली.. तेवढाच काय तो आराम…. समीर कमवता होता.. घरात माणसे मात्र चार.. सई, समीर, समीर चे आई,वडील. सई गावाकडची होती पण स्वभाव बोलका असल्यामुळे मुंबई सारख्या मोठ्या शहरात पटकन रुजली.. कामाच्या ठिकाणी ओळखीची माणसं झाली होती. लग्नानंतर मुंबईत आली व लगेच एका छोट्या कंपनीत नोकरी मिळाली. पगार तसा कमी.

होता परंतु घरात बसून राहण्यापेक्षा कुठेतरी नोकरी करावी. हीच तीची इच्छा होती. नोकरी करण्यापूर्वी सासूबाई ने घरातील सर्व कामे उरकून जावे लागेल हे स्पष्टच सांगितले. सई ने सुद्धा हो म्हणून कामाला जाऊ लागली. दररोज ची धावपळ सुरूच होती. त्यात घरात कुणाचा Support नव्हता. तरीसुद्धा तिन संसाराच रहाटगाडगे सुरळीत चालू ठेवल होत. विचार करता करता ट्रेन विरार ला पोहोचली.उशीर झाला होता.तिच्या मनात विचार येत होते. आज जर उशीर झाला तर नोकरी जाईल. ती घाईने कशीबशी वाट काढत डब्यातून उतरणार इतक्यात तिचा तोल गेला व ती डब्यातून खाली पडली. लगेच आजूबाजूला गर्दी झाली.

तिनं तिथेच तिचा जीव सोडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती, एकीकडे तिच्या पर्स मधून पडलेला करपलेली पोळी चा डबा सांडला होता.. तिच्या ओळखपत्र मध्ये तिचा पत्ता पोलिसांनी मिळाला. त्यांनी तिच्या घरी फोन केला. समीर चा फोन silent होता. तो झोपला होता कारण त्याला सुट्टी होती. सासूबाई ची सुद्धा सकाळ झाली नव्हती. सार घर झोपले होते. सई माञ रक्ताच्या थारोळ्यात बेवारस अवस्थेत पडली होती. सार काही संपल होत. रात्री पासून सकाळपर्यंतची धावपळ आता थांबली होती.ती आता शांतपणे तिरडीवर निजली होती…. मित्रांनो तुम्हाला या स्त्री बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 जेव्हा पत्नीच्या मित्राबद्दल पातीला कळते तेव्हा पती तिच्या सोबत असे वागतो की, जाणून तुम्हाला धक्काच बसेल.

 सकाळी सगळे कामावर निघून गेल्यावर. ऋता ने पोह्याची डिश पुढे घेतली. खरं तर गार पोहे तिला अजिबात आवडत नव्हते. पण आज खूपच घाई झाली. पट्टकन खायला जमलेच नाही. खूपचं उलटसुलट काम करावे लागले आज. स्वतःशीच म्हणाली, माझचं मेलीच चुकलं. माहित होत घरात भाज्या नाही, पण कंटाळा केला. त्याची शिक्षा पण भोगायलाच पाहिजे नं. घरात थोड्या थोड्या भाज्या होत्या.

त्यात एकाला एक आवडते तर, दुसऱ्याला दुसरीच. मग काय घातला तीन भाज्यांचा घाट. डबा पाहून आज प्रत्येक जण मात्र सुखावणार हे नक्की. प्रत्येकाच्या आवडीची भाजी डब्यात ! तरी हे म्हणाले ऋता अग नको देऊस आजच्या दिवस डबा , निदान मला तरी. खाईन मी बाहेर. नाही तर असं कर, तू मला फक्त पोळ्या बांधून दे. भाजी घेईन मी कॅन्टीग मधून. काही नको अहो करते पटपट. मग म्हणाले तू भाजी टाकते फोडणीला तोवर मी तुला पोहे भरवतो . एक घास तू , एक घास मी. तुझे दोन्ही काम होतील. तसेही गार पोहे तुला आवडत नाही ना..! काहीतरीच काय हो तुमचं ? थोडी लाज ! शरम…! पोरं मोठी झाली आपली.

अन तुम्हाला भारी काय काय सुचते ? अग त्यात काय आली लाज शरम.? उलट आपलं प्रेम पाहून पोरं बायकोवर जास्त प्रेम करतील.! या बाबतीत पोरं माझ्यावर गेलेली चालतील हं मला ! ऋता स्वतःशीच हसली .खरचं खूप प्रेम करतात विनय. खूप विनयशील माणूस.! पण तेवढेच शीघ्रकोपी. तंत्रितच गार पोहे संपवले. एकीकडे चहा गॅसवर ठेऊन. पेपर वाचायला घेतला. तेवढ्यात झाडांना पाणी घालायला बकुळा आली. तिला चहा वाढवायला सांगून पेपर वाचत बसले. तितक्यात फोन ची रींग वाजली. बकुळेनेच फोन उचलला. अर्थात मीच म्हणाले, बकुळा जरा फोन उचल गं! निवांत पेपर सुद्धा वाचायला मिळत नाही बाई ! काय.

हि फोन ची कटकट ? बकुळेने फोन उचलला. फोन माझी मैत्रीण नीता चा होता. लगेच माझ्या हवाली कॉडलेस देऊन ती चहा आणायला गेली. नीता म्हणाली, ऋता अग मार्केट ला जाऊयात का. ? का गं काही विशेष ? हो गं नणंद बाई येणार आहे. म्हंटल छानशी साडी आणावी. नवरात्री पण आहेच. घरच्या या माहेरवाशीणला साडी घेऊ म्हंटल. नेहमी गडबडीत पैसेच देतो गं आम्ही तिला. ती कायम म्हणते, वहिनी एखादयावेळी साडीच दे गं ! आईबाबा गेले तेव्हा पासून साडी घेतलीच नाही , माहेरची साडी… वरून म्हणाली, तसे तू पैसे देतेस त्याची साडीच घेते गं मी प्रत्येक वेळी . पण का कोणास ठाऊक तिला माहेरच्या साडीची सर नाही.

बरं का वहिनी ! आणि ती हे खूप मनातून बोलते गं ! ह्यांना आईवडील नाही. दोघा बहीण भावांचा खूप जीव आहे एकमेकांवर आणि माझी पण लाडकीच आहे ती. मलाही बहीण नाही. बहिणी बहिणी सारख्याच राहतो आम्ही. पाहते न तू. विचार केला घेऊनच ठेवावी एखादी साडी . दोनचार दिवस वेळ पण आहे. ठिक आहे नीता . खरतर मला पण मार्केटला जायचेच होते. का ग ? तुझी पण नणंद येते की काय? नाही गं! आणि माझी नणंद! अगदी भावना शून्य तिला उलट पैसे घ्यायला आवडतात .आपल्या आवडीने पाहिजे तशी घेता येते साडी.. दोन वर्षांपूर्वी मी दिवाळीला साडी घेऊन ठेवली तिला . तर म्हणते कशी. वहिनी अगं.

काय हे? निदान साडी घेतांना मला विचारायचे तरी ना ? हा colour आहे गं माझ्याकडे! त्यापेक्षा तू मला पैसेच देत जा… बरं ते जाऊ दे, अगं मला आज भाजीला जायचे होते. कालपासून घरात एक भाजी नाही. आज जायलाच पाहिजे. सकाळीच सांगून झालं माझं मलाच. ऋताबाई आज भाजीला जायचे बरं का ? नीता हसायला लागली. चहा घेऊन पेपर बाजूला सारला. पटापट काम उरकून निघालो. साडी आणि भाजीच्या शॉपिंगला. आधी साडी च्या दुकानात गेलो. नेहमीचाच ओळखीचा दुकानदार. छान साडया दाखवल्या. नीताने दोन साडया घेतल्या. एक तिला , एक नंदेला . तिथून मोर्चा भाजीकडे वळवला.

भाजी मार्केट मध्ये भाजी घेत असताना. एक चेहरा ओळखीचा वाटला. तोही भाजीच घेत होता. त्याने smile दिले. पक्की ओळख नाही पटली . पण का कोण जाणे मी त्याला कुठेतरी पहिले असे सारखे वाटतं होते. मी ही त्याला smile दिली आणि दोघे एकदम बोललो. तू ऋता न! तुम्ही श्रीकांत न! हो ! हो! दोघेही एकदमच बोललो. मी म्हणाले, अहो पण तुम्ही इथे कसे. म्हणाला मी ट्रान्स्फर होऊन आत्ताच आलो. अजून जॉईन सुद्धा नाही झालो. सामानाची लावालाव चालू आहे. दोन दिवस बाहेरच जेवलो. आजपासून घरी सुरुवात करायची आहे. बायकोला तेवढीच मदत. म्हणून हे दिव्य काम करतोय. मग तोच म्हणाला चल कॉफी घेऊ.

मी म्हणाले नाही हो . घरी जायला हवं आणि आपल्या गप्पांमुळे माझी ही मैत्रीण नीता कंटाळून जाईल. मग तो अदबीने तिला म्हणाला … ताई खूप दिवसाने मैत्रीण भेटली. प्लीज चला नं थोडी कॉफी घेऊ. आम्ही जवळच्याच हॉटेल मध्ये कॉफी प्यायला बसलो. कॉलेज चे मित्र मैत्रिणी असलो तरी मी सुरवातीला खूप अदबीने त्याच्याशी बोलत होते. मग तोच म्हणाला, काय गं ? मी केव्हापासून बघतो . मी तुला अग, का ग संबोधतो आणि तू मात्र मला काकाजी बनवून टाकले. सारखे अहो जाहो करते. त्याच्या बरोबर आम्ही दोघी हसायला लागलो. मग तो कॉलेज च्या एकेक आठवणी सांगू लागला. बोलता बोलता.

म्हणाला खरं सांगू ऋता. मला तू खूप आवडायची. पण तुझ्या मनाचा थांग कधी लागलाच नाही. मग मीच बाजूला झालो. पण बरं झालं हं खूप समझदार बायको मिळाली मला. ये तुझा नवरा कसा आहे ग? माझा नवरा पण खूप चांगला आहे. विनय त्याचं नाव, नावाप्रमाणेच. गप्पा मारून , कॉफी पिऊन आम्ही निघालो. त्याने हातात हात घेऊन चल बाय म्हणून पुन्हा भेटीचे आश्वासन देऊन निघणार तोच त्याच्या लक्षात आलं , म्हणाला ऋता अग मोबाईल नंबर तरी दे ! मग एकमेकांच्या नंबर ची देवाण घेवाण झाली आणि घरी आलो. आता रोज सकाळी तो good morning चे मेसेज पाठवू लागला. मीही पाठवू लागले.

नेहमी मेसेज मध्ये डिअर किंवा डिअर friend असंच लिहायचा. रविवारी सकाळीच हे बाहेर दाढी करायला गेले. रस्त्यात सुहास भेटला. सुहासने श्रीकांत बद्दल यांना काय सांगितले कोणास ठाऊक. हे लगेच घरी आले. जरा चिडूनच होते. मला हाक मारली, ऋता ! ये ऋता ! इकडे ये! मी ओळखलं पारा चढला. आपण शांत राहिलेलं बरं. मला यांचा स्वभाव चांगला माहित आहे. कुठलाही सारासार विचार न करता पटकन ताडताड बोलत सुटतात.त्त्यावेळी आपण शांत बसायचे. शांत झाल्यावर जर त्याला त्याची चूक पटवून दिली तर लगेच सॉरी पण म्हणतात. मुलं नेहमी म्हणतात. आई कशी राहिली गं तू या माणसा बरोबर.

किती बोलतात राग आला तर ? मी त्यांना नेहमी म्हणते . अरे तुम्ही नाण्याची एकच बाजू पहिली . दुसरी मलाच माहित. तुम्ही पाहिले नं, तुम्हाला साधी चापट सुद्धा कधी मारली नाही. आज पुन्हा असंच काहीतरी झाले असावे. ऋता बाहेर आली . विचारले अहो काय झाले ? का इतका आरडा ओरडा करताय ? तू आठ दिवसापूर्वी कुठे आणि कोणाबरोबर बाहेर गेली होती. ऋता ला कळलेच नाही विनय काय बोलतात. शेवटी न राहवून ती हळूच बोलले. अहो मला समजेल असं बोला . उगाच कोड्यात बोलू नका. मग म्हणाले, कोणत्या मित्रांसोबत फिरत असते गं माझ्या माघारी ? म्हणाले तुझा मोबाईल दाखव. ती काहीच.

बोलली नाही, मोबाईल तिथेच होता , हातात दिला. तिच्या मोबाईलला लॉक कधीच नसते. लगेच व्हाट्सअप्प उघडून मेसेज पाहिले. श्रीकांत चे मेसेज वाचले. अच्छा म्हणजे हा तो तुझा डिअर ! माझ्या माघारी हे सगळं चालते तर ! तरीही ती शांतच. बडबड करून तो सुद्धा शांत झाला. ऋताने जेवण बनवले . रागातच झोपले होते. जेवायला उठवले , बोलले मला नाही जेवायचे ! पोट भरलं माझं! खूप विश्वास घात केला माझा तू ! ऋता प्रेमाने म्हणाली, विश्वास घात मी केला , तर मला शिक्षा व्हायला पाहिजे. तुम्ही का भोगता ? चला जेवून घ्या ! तसेही तुम्हाला उपाशी असले की चक्कर येते नं ! उठा बर ! शपथ आहे तुम्हाला.

माझी आणि मुलांची . आपलं ठरलं न, काही झालं तरी जेवणावर राग काढायचा नाही. मग उठले , गुपचूप जेवण केले. पुन्हा हॉल मध्ये जाऊन बसले.ऋता मागच आवरून विनय जवळ जाऊन बसली. आता राग थोडा निवळला होता. तिने हातात हात घेतला. म्हणाले काय झाले.? कोणी काही सांगितले , बोलले का तुम्हाला ? मग ते म्हणाले , नीताच्या नवऱ्याने सुहासला सांगितले. सुहासने आज मला सांगितले. पण काय सांगितले ? मला तरी कळू द्या ? मग त्यानीं सुहासने सांगितलेले वाक्य न वाक्य सांगितले. कोणताही नवरा हे एकूण संतापणारच. पण तिला माहित होत. नीता आणि भाऊजी इतक्या खालच्या पातळीवर.

कधी जाऊच शकत नाही. तिने नीताला फोन केला. नीता जेवण झाले का ग.? झाले असेल तर भाऊजींना घेऊन icecream खायला ये ! दहा मिनिटात दोघेही आले. घरात icecreem होतेच. बोलता बोलता श्रीकांत चा विषय काढला. नीता आणि भाऊजी खूप चांगले बोलत होते त्याच्या बद्दल आणि बोलता बोलता हेही म्हणाले. मी सुहासला पण बोललो हे. त्याच काय झालं विनय . अरे त्याला त्याची कॉलेज ची मैत्रीण भेटली फेसबुक वर खूप वर्षाने. सांगत होता. तर मीही सांगितले , अरे आपली ऋता वहिनीला आहे न तिला पण तिचा कॉलेजचा मित्र भेटला. आठ दिवसापूर्वी, याच गावात तेही अचानक . बदली झाली म्हणे त्याची इथे.

भाजी घेतांना मार्केट मध्ये भेट झाली. भाऊजी इतकेच बोललात तुम्ही सुहास ला ! हो वाहिनी! का काय झालं ? नाही हो खरचं काही नाही ? हे आज जेवतांना म्हणाले, आपण तुझ्या कॉलेज friend … श्रीकांतला बोलऊया का जेवायला फॅमिली सहित ? मग मी म्हणाले श्रीकांत ला नंतर बोलयू. त्या आधी दिनेश भाऊजींना आणि नीताला icecreem खायला बोलावते. खूप दिवसात तुम्ही दोघे आलाच नाही. म्हणून आज मुद्दाम icecreem खायला बोलवले. icecreem खाऊन दोघेही जायला निघाले. बरं ऋता म्हणून दोघे निघून गेले. मुलं बाजूच्या बेडरूम मधून सगळं ऐकतच होते. मग ऋता ने पुन्हा त्याचा हात हातात घेतला. म्हणाले.

सुहास कसा आहे हे तुम्हाला मी सांगायला हवं का ? कुणाचेही चांगले डोळ्यात सलणारा हा माणूस. आपले किती प्रेम आहे एकमेकांवर चांगले ठाऊक आहे त्याला . मागे पण तुमच्या बद्दल काय काय सांगून माझे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला.मी भीक घातली नाही तर , आता तुम्हाला पकडलं आणि खोटनाट सांगून तुमचे मन कलुषित केले आणि तुम्ही विश्वास ठेवला? काय बोलू मी! मग स्वतःच म्हणाले. खरंय गं ! मी हे तर साफ विसरूनच गेलो होतो. खरं सांगू का आधी माझा विश्वास बसलाच नाही . पण मी घरी येऊन तुझा मोबाईल चेक केला. त्यातले ते श्रीकांतचे सारखे ते डिअर , डिअर मग माझा तोल गेला आणि.

तुला वाट्टेल ते बोललो. मग ऋता म्हणाली खरतर माझं हि चुकलंच हो. मी सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे होते श्रीकांत बद्दल. पण पहिल्यांदाच भेटला इतकं लक्षात नाही राहील. तुम्ही ऑफिसला सगळे गेल्यावर मोबाईल बघते. त्याचा मेसेज असतो good morning चा. मी सुद्धा रिप्लाय द्यायचा म्हणून देते. मुद्दाम असं काहीच नाही. मुख्य म्हणजे तुम्ही माझ्या बद्दल असा विचार करणार. हे स्वप्नात पण नाही वाटलं हो ! आता मला सांगा तुम्ही ऑफिस मध्ये जाता. घरी आल्यावर किती तरी लोकांशी बोलतांना एस डिअर! नो डिअर ! असं बोलतांना तुम्हाला माझ्या कानाने ऐकलं. मी नाही कधी विचारलं हि डिअर कोण?.

कधीच तुमचा मोबाईल चेक नाही केला…कारण… कारण…माझा विश्वास आहे. माझा नवरा असं काही करूच शकत नाही. माझा नवरा माझ्याशी कधीच प्रतारणा करणार नाही. तुम्ही मात्र विश्वास नाही ठेवला. आता मला सांगा. काय शिक्षा करायची तुम्हाला ? उठून उभे राहिले. लोटांगण घालत म्हणाले, चुकलं ग ! खरंच माफ कर ! ती म्हणाली, अहो मी नेहमीच माफ करत आले हो. पण मला वाईट या गोष्टीच वाटत. इतके प्रेमळ तुम्ही. एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीचा कोणताही सारासार विचार न करता राई चा पर्वत करता. खूप त्रास होतो . बदला थोडा स्वभाव. खरंच ग चुकतेच माझं ! एक मात्र खरं ! त्यावेळी तू शांत असतेस.

कदाचित म्हणूनच मला अधीकच आवडते. अलगद ओठावर ओठ ठेवले. दोन्ही बाहुत, घट्ट मिठीत सामावून घेतले. देहभान विसरून चुंबनाचा वर्षाव होत राहिला. दोन्ही बाजूने. डिअर चा घोळ आणि त्यामुळे झालेला संताप ओसरून, त्याची जागा आता प्रेमाने घेतली होती. विनय फक्त सॉरी डिअर ! सॉरी डिअर ! इतकचं म्हणत होता. दोन्ही मुले बाहेर येऊन टाळ्या वाजवत होते. ऋता लाजून, अलगत विनयच्या मिठीतुन सुटण्याची धडपड करत होती. मित्रांनो तुम्हाला हिच्या बद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

पत्नीने वयाच्या पंचावन्नव्या वाढदिवशी पतिकडे असे काही गिफ्ट माघीतले की ते ऐकून पतीला.

पंचवन्नाव्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं, “बोला राणी सरकार काय हवंय वाढदिवशी”. “मंद स्मित करून ती म्हणाली,” जाऊ द्या तुम्ही नाही देऊ शकणार. डायरेक्ट कुवतीवर संशय घेतल्यावर पतीदेव हादरलेच, “नाही आता तर तुला मागावंच लागेल.” “बरं ठीक आहे, द्या मला मॅरीड बॅचलर लाईफ” ती अगदी शांतपणे म्हणाली, म्हणजे? तुला काय मी डांबून ठेवलंय आणि.

मारतोय, झोडतोय, काही कमी केलंय? काहीसं चिडूनच त्याने विचारल. “फक्त हीच कारणे हवीत का ओ स्वतंत्र आयुष्य जगायला, आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं, जगावं हे एक कारण पुरेसं नाही का?, रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा अन सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा, ऑफिस ला जायची लगबग अन ट्रेन मध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे, घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू, मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, तुमची चिडचिड, तुमचं काम, तुमची सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात माझी मी हरवून गेलीय, तुम्ही ऑफिस वरून घरी आल्यावर.

मोबाईल मध्ये, तोंड खुपसून. कधी तरी कामाव्यतिरिक्त चार शब्द बोललात का मला?, कामात मदत तर सोडाच पण कधी पाहिलत का की सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी काय करत असते. ऑफिस मधून घरी आल्यावर तुमची स्पेस तुम्ही घेतली ना कायम, तुमच्या वेळेत झोपला, तुमच्या वेळेत उठलात . आता तुम्ही रिटायर झालात आता मलाही रिटायर करा. तुम्हाला हवं तस आयुष्य जगताय ना मग मलाही जरा मनासारखं जगू द्या. नाहीतरी तुम्हाला काय लागत माझ्याकडून दोन वेळचं जेवण, दोन वेळ चहा, एक वेळ नाश्ता, सुना आल्यात, तेवढं तर करतीलच सासऱ्यासाठी,” हो की नाही ग सुनेकडे.


पहात ती म्हणाली. “अग पण तू एकटी करणार काय?, कुठे जाणार आहेस?, कुठे राहणार आहेस ?”, “माझा सगळा विचार करून झालाय, मुले ही व्यवस्थित कमवतात, आपल्या दुसऱ्या फ्लॅट मध्ये भाडेकरू आहेत. थोड्या दिवसात त्यांचं ऍग्रिमेंट संपेल मी तिथे जाऊन राहीन. बँकेत पैसे आहेत , त्याच्या व्याजावर भागेल माझं.” पण अग..! लोक काय म्हणतील?, आता मात्र तिला खुदकन हसू आलं, लोकं? ती कधी काय नाही म्हणत, त्यांचं कामच आहे बोलायचं, तुम्ही नाही का उठसुठ लोकांना नावे ठेवत. पण ते त्यांना करायचं तेच करतात ना?. नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना.

स्वतः पेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची पर्वा असते. अहो तुमच्या सारखेच काळजीवाहू आहेत ते, समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रश पडतो. हा एवढा कसा सुखी आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो इतकं असूनही हा इतका कसा दुःखी?, गरीबाला तुच्छ समजायचं आणि श्रीमंताला घमेंडी, मला लोकांची कारणे देऊ नका. इतकी वर्ष तुम्हाला विचारून सगळं केलंय आता हे सुद्धा तुमच्या मर्जीनेच करेन. नेमकं काय करणार आहेस तिथे राहून?. पाहिजे तेंव्हा झोपेन, पाहिजे तेंव्हा उठेन, कधीही काहीही बनवून खाईन कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूव्ही बघायचा.

तर जाऊन पाहीन, मॉल मध्ये जाऊन विंडोशॉपिंग करीन, कधी एखाद्या उच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहीन. तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोळ्यात साठवीन, कधी लहान मुलांच्या बागेत जाऊन त्यांना बागडताना पाहीन, बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता जाईन आणि चिम्ब भिजून घेईन बाहेरून अन आतूनही, तासंतास शांत, निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेन. कधी समुद्राला डोळ्यात साठवून घेईन तर कधी फुलांचा सुगंध हृदयात भरेन, आवडत्या लोकांना भेटीन मित्र मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारेन कारण त्यावेळी तू माझ्या बोलण्या कडे, आणि फोनकडे नजर रोखून.

मी कधी फोन खाली ठेवते याची वाट पाहत नसशील, तुझी जेवायची वेळ झाल्यावर माझ्या छातीत, तुझ्या भुकेची धडधड नाही सुरू होणार, कधी एखादं नाटक पहावस वाटलं तर एकटी पूर्ण बकेटभर मिक्स पॉपकॉर्न खात एन्जॉय करीन, कुठे फिरायला गेली आणि एखादं ठिकाण जास्त आवडलं तर थोडा जास्त वेळ बसेन, त्यावेळी तुझ चल लवकर उशीर होतोय, हे टूमणं लागलेल नसेल. कधी मध्यरात्री लिखाण करावंसं वाटलं तर मस्त गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत, मनातलं सगळं वेळीच लिहून काढेन. अरे वा..! तू लिहिणार? काय कविता की लेख?. अचानक लेखिका कुठून जन्माला आली, तो कुत्सित पणे.

म्हणाला. तू कधी वाचलंस मला? तीने रोखुन विचारलं, अग..! पण हे सगळं तू माझ्या सोबतही करू शकते. त्याने विषय फिरवला….! खरंच? अर्ध आयुष्य संपल्यावर?. आता जेंव्हा मी तुला आहे तसा मान्य केल्यावर? आता तू माझ्या सोबत हे सगळं करणार?. जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते चार दिवसात घडेल?. जगतो आहेस ना मनासारखा, तुला आवडेल तसा, आले का तुझ्या कोणत्या गोष्टीत मध्ये?, जे स्वतःला हवं तेच केलंस ना, मग आता मला करू दे की माझ्या मनासारख, बघ माझं वय काय झालंय, आता तरी विश्वास ठेव, तू मला बेड्या नाही घातल्यास, फक्त पंखांना दगड बांधून उडायची परवानगी दिलीस.

आता माझं वय झालंय ते दगड झेपत नाहीत मला, ते ओझं तुझ्याच हातानी कमी कर बास इतकंच हवंय, मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

 

पत्नीने वयाच्या पंचावन्नव्या वाढदिवशी पतिकडे असे काही गिफ्ट माघीतले की ते ऐकून पतीला.

पंचवन्नाव्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला विचारलं, “बोला राणी सरकार काय हवंय वाढदिवशी”. “मंद स्मित करून ती म्हणाली,” जाऊ द्या तुम्ही नाही देऊ शकणार. डायरेक्ट कुवतीवर संशय घेतल्यावर पतीदेव हादरलेच, “नाही आता तर तुला मागावंच लागेल.” “बरं ठीक आहे, द्या मला मॅरीड बॅचलर लाईफ” ती अगदी शांतपणे म्हणाली, म्हणजे? तुला काय मी डांबून ठेवलंय आणि.

मारतोय, झोडतोय, काही कमी केलंय? काहीसं चिडूनच त्याने विचारल. “फक्त हीच कारणे हवीत का ओ स्वतंत्र आयुष्य जगायला, आपलं आयुष्य आपल्यासाठी, आपल्या मनासारखं, जगावं हे एक कारण पुरेसं नाही का?, रात्री झोपताना सकाळी डबा काय करायचा अन सकाळी डबा करताना आता नाश्ता काय करायचा, ऑफिस ला जायची लगबग अन ट्रेन मध्ये डोक्यात ऑफिसची पेंडिंग कामे, घरी येताना रात्री जेवायला भाजी काय करू, मुलांचं शिक्षण, अभ्यास, नोकरी, तुमची चिडचिड, तुमचं काम, तुमची सगळ्यांची आजारपणे, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, यात माझी मी हरवून गेलीय, तुम्ही ऑफिस वरून घरी आल्यावर.

मोबाईल मध्ये, तोंड खुपसून. कधी तरी कामाव्यतिरिक्त चार शब्द बोललात का मला?, कामात मदत तर सोडाच पण कधी पाहिलत का की सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत मी काय करत असते. ऑफिस मधून घरी आल्यावर तुमची स्पेस तुम्ही घेतली ना कायम, तुमच्या वेळेत झोपला, तुमच्या वेळेत उठलात . आता तुम्ही रिटायर झालात आता मलाही रिटायर करा. तुम्हाला हवं तस आयुष्य जगताय ना मग मलाही जरा मनासारखं जगू द्या. नाहीतरी तुम्हाला काय लागत माझ्याकडून दोन वेळचं जेवण, दोन वेळ चहा, एक वेळ नाश्ता, सुना आल्यात, तेवढं तर करतीलच सासऱ्यासाठी,” हो की नाही ग सुनेकडे.


पहात ती म्हणाली. “अग पण तू एकटी करणार काय?, कुठे जाणार आहेस?, कुठे राहणार आहेस ?”, “माझा सगळा विचार करून झालाय, मुले ही व्यवस्थित कमवतात, आपल्या दुसऱ्या फ्लॅट मध्ये भाडेकरू आहेत. थोड्या दिवसात त्यांचं ऍग्रिमेंट संपेल मी तिथे जाऊन राहीन. बँकेत पैसे आहेत , त्याच्या व्याजावर भागेल माझं.” पण अग..! लोक काय म्हणतील?, आता मात्र तिला खुदकन हसू आलं, लोकं? ती कधी काय नाही म्हणत, त्यांचं कामच आहे बोलायचं, तुम्ही नाही का उठसुठ लोकांना नावे ठेवत. पण ते त्यांना करायचं तेच करतात ना?. नुसते घरातच नाही तर जगात सुद्धा असे अनेक लोक आहेत ज्यांना.

स्वतः पेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची पर्वा असते. अहो तुमच्या सारखेच काळजीवाहू आहेत ते, समोरचा माणूस जास्त सुखात दिसला की त्यांना प्रश पडतो. हा एवढा कसा सुखी आणि जास्त दुःखात दिसला तरी प्रश्न पडतो इतकं असूनही हा इतका कसा दुःखी?, गरीबाला तुच्छ समजायचं आणि श्रीमंताला घमेंडी, मला लोकांची कारणे देऊ नका. इतकी वर्ष तुम्हाला विचारून सगळं केलंय आता हे सुद्धा तुमच्या मर्जीनेच करेन. नेमकं काय करणार आहेस तिथे राहून?. पाहिजे तेंव्हा झोपेन, पाहिजे तेंव्हा उठेन, कधीही काहीही बनवून खाईन कधी वाटलं की छान आवडीचे कपडे घालून एखादा मूव्ही बघायचा.

तर जाऊन पाहीन, मॉल मध्ये जाऊन विंडोशॉपिंग करीन, कधी एखाद्या उच डोंगरावर जाऊन पहाटेचा उगवता सूर्य पाहीन. तर कधी क्षितिजावर मावळती संध्याकाळ डोळ्यात साठवीन, कधी लहान मुलांच्या बागेत जाऊन त्यांना बागडताना पाहीन, बाहेर पाऊस पडत असेल तर मुद्दाम छत्री न घेता जाईन आणि चिम्ब भिजून घेईन बाहेरून अन आतूनही, तासंतास शांत, निवांत एखाद्या देवळाच्या पायरीवर बसेन. कधी समुद्राला डोळ्यात साठवून घेईन तर कधी फुलांचा सुगंध हृदयात भरेन, आवडत्या लोकांना भेटीन मित्र मैत्रिणींशी भरपूर गप्पा मारेन कारण त्यावेळी तू माझ्या बोलण्या कडे, आणि फोनकडे नजर रोखून.

मी कधी फोन खाली ठेवते याची वाट पाहत नसशील, तुझी जेवायची वेळ झाल्यावर माझ्या छातीत, तुझ्या भुकेची धडधड नाही सुरू होणार, कधी एखादं नाटक पहावस वाटलं तर एकटी पूर्ण बकेटभर मिक्स पॉपकॉर्न खात एन्जॉय करीन, कुठे फिरायला गेली आणि एखादं ठिकाण जास्त आवडलं तर थोडा जास्त वेळ बसेन, त्यावेळी तुझ चल लवकर उशीर होतोय, हे टूमणं लागलेल नसेल. कधी मध्यरात्री लिखाण करावंसं वाटलं तर मस्त गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत, मनातलं सगळं वेळीच लिहून काढेन. अरे वा..! तू लिहिणार? काय कविता की लेख?. अचानक लेखिका कुठून जन्माला आली, तो कुत्सित पणे.

म्हणाला. तू कधी वाचलंस मला? तीने रोखुन विचारलं, अग..! पण हे सगळं तू माझ्या सोबतही करू शकते. त्याने विषय फिरवला….! खरंच? अर्ध आयुष्य संपल्यावर?. आता जेंव्हा मी तुला आहे तसा मान्य केल्यावर? आता तू माझ्या सोबत हे सगळं करणार?. जे एवढ्या आयुष्यात नाही घडलं ते चार दिवसात घडेल?. जगतो आहेस ना मनासारखा, तुला आवडेल तसा, आले का तुझ्या कोणत्या गोष्टीत मध्ये?, जे स्वतःला हवं तेच केलंस ना, मग आता मला करू दे की माझ्या मनासारख, बघ माझं वय काय झालंय, आता तरी विश्वास ठेव, तू मला बेड्या नाही घातल्यास, फक्त पंखांना दगड बांधून उडायची परवानगी दिलीस.

आता माझं वय झालंय ते दगड झेपत नाहीत मला, ते ओझं तुझ्याच हातानी कमी कर बास इतकंच हवंय, मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.