Thursday, August 13, 2020

 

औरंगजेब छ. संभाजी महाराजांच्या विषयी असा बोलला की ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल..

आणि सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडला छावा, “येऊदे त्या औरंगजेबाला आता बघेल या शिवपुत्र संभाजीचा गनिमी कावा”, आणि सुरू झाले महाराष्ट्र भूमीत अग्नीतांडव, आलमगीर बादशहा औरंगजेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराज यांच्यांमध्ये औरंगजेबाला वाटले होते स्वराज्य म्हणजे “काऊ चिऊचा घास” सहज घेऊन टाकू पण त्याला माहितीच न्हवते स्वराज्य जणू सुरावरची पोळीच…..! तब्बल नऊ वर्ष संभाजी महाराजांनी याच औरंगजेबाला सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून फिरवलं, आणि त्याची मस्ती पुरी जिरवी, आणि मग मात्र तब्बल नऊ वर्षांनी संभाजी राजे औरंगजेबाच्या.

हाती लागले. आदिलशाही 2 महिन्यात संपवनाऱ्या, कुतुबशाही महिन्याभरात पलती घालणाऱ्या औरंगजेबाला संभाजी राजेंना कैद करायला नऊ वर्षे लागली. लाखोंची फौज, हजारो हत्ती, घोडे उंट, अगणित असा खजिना आणि तब्बल नऊ वर्षाची अस्वस्थता, खूप काही गमवलं या औरंगजेबाने, औरंगजेब महाराष्ट्रात येऊन अक्षरशः भिकारडा झाला होता. या सगळ्या गोष्टींचा भरपाई करण्यासाठी बदला घेण्यासाठी औरंगजेबाने संभाजी राजेंचा अत्यंत अमाणूस छळ केला. ज्या माणसाने आपल्या बापाला विष देऊन मारले ज्या माणसाने आपल्या सख्ख्या भावांना कत्तल करून मारलं ज्या माणसाने.

स्वतःच्या मुलीला कैद करून मारलं, तो औरंगजेबासारखा निर्दई आणि क्रूर माणूस संभाजी महाराजांना तरी जिवंत कसा सोडेल….. औरंगजेबाने संभाजी राजेंचा छळ चालू केला, सर्वप्रथम त्याने संभाजी राजेंची चामडी काढली, मग संभाजी राजेंचे डोळे काढले, संभाजी राजेंची जीभ कापली, संभाजी राजेंच्या कानात उखळत्या शिशाचा रस ओतला, पण एवढे सगळे अन्याय होत असताना माझा छावा होता ताट, झुकली नाही मान, आणि वाकला नाही काना, आणि औरंगजेबाला कळले की या स्वराज्याचे पाणी काही न्यारच आहे. करण डोळे संभाजी राज्यांचे काढले होते परंतु चाचपडत मात्र औरंगजेब होता.

जीभ संभाजी कापली गेली होती परंतु बोबडी मात्र त्या औरंगजेबाची वळली होती, उखळत्या शिशाचा रस संभाजी महाराजांच्या कानात ओतला होता पण हर हर महादेवच्या गर्जना ऐकून औरंगजेब बहिरा झाला होता. कैद होऊन सुद्धा संभाजी राजे विजयी झाले होते, परंतु संभाजी राजेंना कैद करूनही औरंगजेबच पराभूत झाला होता. विजयाचा जल्लोष सुद्धा संभाजी राजेंनी त्या औरंग्याच्या वाट्याला येऊच दिला नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर देखील संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबा थेंबातुन या महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक घरा घरात एक एक संभाजी निर्माण झाला. औरंगजेबाशी टक्कर.

देतच राहिला, आणि स्वराज्य काबीज करायचे औरंगजेबाचे स्वप्न पुन्हा अभंग पावलं….. अहमदनगर जिल्ह्यातील भिंगरी या गावी दिनांक १६ फेब्रुवारी १७०७ च्या रात्री औरंगजेब आपल्या अखेरच्या घटका मोजत होता. त्याच्या शेवटच्या क्षणी देखील त्याला दिल्ली दिसत न्हवती, आगरा दिसत न्हवता, आगऱ्याचा लाल किल्ला देखील दिसत न्हवता, तर दिसत होते फक्त मराठे….! शंभू राजे आणि शिवाजी राजे तलवारी घेऊन आपल्या दिशेने येताना, वयाच्या ९३व्या वर्षी आपल्या शेवटच्या क्षणी हा औरंगजेब पाश्चातापाच्या आगीत होरफळून निघत होता, केलेल्या आपल्या सर्व कु कर्माची त्याला लाज वाटत होती.

समोर दिसत होते अस्पस्ट संभाजी महाराज आणि त्याला आठवत होत्या आपण त्याला सतावलेल्या सजा….. आणि शंभू राजेंच्या त्या अस्पष्ट आकृतीकडे बघत औरंगजेब नकळत बोलला “सचमूच छावा हे छावा शेर का”…. “हमने आखे निकाल दि उसकी, लेकीनउसने नाही झुकाई अपनी आखे हमारे सामने”, “हमने जबान काट दि उसकी जबान, लेकीन उसने नही मांगी उस जबानसे अपनी जान की भीक”, “हमने हात काट दिये उसके, लेकीन उसने नही किया कुर्निसात उस हातोसे हमे”, “हमने पाव काट दिये उसके, लेकीन नाही भागा उसी पाव से अपनी जान बचाने के लिये”, “अरे हमने सिर कलम कर दिया उसका.

लेकीन उसने नही टेका अपना माथा हमारे सामने”, सचमूच छावा हे छावा शेर का……!! हे परवरदिगार, हे मालिक, काश इसके जैसा एक भी बेटा होता मेरा तो पुरी कायनात पे इस औरंगजेब का राज होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

No comments:

Post a Comment