Tuesday, November 8, 2011

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,

कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,

किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,

आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते ...
मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....
अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ..
हे ही समजत नाही .....

पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ....
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ....

मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
यात आकर्षणाचा भाग नाही ..
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे ....

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
स्वत:पासून हरवत गेलोय
तुझंच स्मरण असते फक्त
सगळं काही विसरत गेलोय

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय

मन तुझ्याचभोवती फिरते आहे
आकाशाकडे पाहत रात्री
स्वत:शीच उसासे भरते आहे

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय
जीवन सुंदर झालाय माझं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
चिंब चिंब मन न्हालंय माझं

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय

आयुष्याचे अर्थ कळाले
तुझ्या रूपानेच मला गं
प्रेमरूपी दैवत मिळाले!!
तिच्या प्रेमात पडायला मला काय पुरेस होत
तिच ते अप्रतिम सौंदर्य फक्त
माझ्या डोळ्यांना भुरळ घालणार …………
तिच हसण लाजण चालण वागण आणि बोलण
तिचा जात धर्म कुल आणि गोत्र सारच
गौण होत फक्त तिच्या सौंदर्यासमोर ……….
माझी तत्वे चुलीत गेली माझे महान विचार
भंगारात जाऊन माझी अब्रू चव्हाट्यावर
आली तरी चालेल तिच्यासाठी जगासमोर ………
मला उगडा करून चौकात टांगला तरी चालेल
फक्त ती नजरेसमोर असायला हवीच
मला टांगलेल पाहताना जगासमोर ………
जे मिळविण्यासाठीच असत त्यासाठी प्राण दिल्यावर
तिच्या डोळ्यातील दोन अश्रू टप टप टप गाळायलाच
हवेत मोल्यावान माझ्या मृत देहावर …………
मान उडवत वेडा कुठला म्हणत रोज
तिच्या नाजूक हातून दोन फुल
पडायलाच हवीत माझ्या समाधीवर ……….

Friday, April 29, 2011

कुणा दुसऱ्या मुलीच्या नजरेला नजर
द्यायलाही आता भीती वाटते
कुणाच्या नजरेतल प्रेम पाहून
माझ्या प्रेमात मलाच उणीव वाटते

तू दिलेल्या विरहाच्या अग्नीत
मी अगदी होरपळून गेलो आहे
तुझ्या आठवणीच्या वादळात आता
सरवस्व झोकून दिल आहे

प्रिया जाता जाता येवढच करून जा
माझ्या प्रेमातली उणीव मला सांगून जा
उणीव संगीतलीस तर,
परत कुणाच्या प्रेमात तरी पडणार नाही
ती उणीव शोधण्यासाठी आयुष्यभर झुरणार तर नाही

मरेपर्यंत दोन दिवस कधीच विसरणार नाही
पहिला म्हणजे तू हो बोललेला ज्यांनी
माझ आयुष्याच पालटून गेल,.. आणि
दुसरा म्हणजे तू निघून गेलेला ज्यांनी
आयुष्यभर तुझ्या बरोबर जगण्याच माझ स्वप्न
अखेर संपून गेलं...........

सांजवेळ झाली की प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्याकडे जातो
दावणीच सोडलेलं वासरू गाईच्या ओटीतच विसावतो
तस माझ मन किती काही केल तरी सावरत नाही
तुझ्या आठवणीशिवाय त्याला काहीच सुचत नाही

जातेस तर जा पण जाता जाता येढच कर तू
दिलेल्या आयुष्य भराच्या दुखातल थोडस दुख कमी कर
ते तेव्हाच कमी होईल फक्त .......
मी शेवटचा निरोपघेण्या आधी त्याच ,,,,,
प्रेमळ नजरेनी मला तुझ्या डोळ्यासमोर धर .........

आता फक्त येवढच कर ,,,
तेव्हा तरी नजर चुकवू नकोस
कारण मी जाणार असेन

मी जात असताना येवढच कर

मनतले अश्रू मनात सुकू देऊ नकोस
त्यांना डोळ्यातून वाहुदे.....
मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे....

मरता मरता का होईना
माझ्या प्रियाला माझ्यासाठी रडताना पाहूदे....

Wednesday, April 6, 2011


गजावर झुकलेल्या रातराणीसारखी
नजर तुझी झुकायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!
निंबोणीच्या झाडामागचा
चंद्रही गालात हसायचा
आभाळातल्या ढगालाही गुपित तुझ सांगायचा
त्याच्यावर उगी तू रागवायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
कळी कळी वेचतांना तू फुलाच्या कानात बोलायची
मी कितीही विचारल तरी
आम्ही नाही जा म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची ....!!
तुझ मात्र बर आहे,येण जाण ही सुरु आहे
मागे वळून पाहतांना काळीज तोडून नेण आहे
भुवई ऊडवत जायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
असे हे किती दिवस चालायच,
मुकेपणातच बोलायच सारे
संकेत कळून सुध्दा न कळल्यागत
करायच अन डोळे मोठे करुन पाहायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची....!!
आता मात्र सोसत नाही,
दिवस काय पण रात्र ही तुझ्याशिवाय जात नाही
असं का व्हावं म्हणून विचारल तरी का ?
लाच कारण नसत म्हणायची
मला मात्र तुझी सवय खरच खूप आवडायची...!!

हि सुखाची घडी, वाटे फुलांची लडी,
श्वास श्वासांत उसळे रोमाचांची सरी...

हि नवी सांज अण चंद्रकोर नविशी,
हि नवी स्व्पनेही वाटती हवीशी...

ना कुणी भोवती, तरी भास भांबावती,

कि कुणी ऐकतो, जे मी बोलते स्वतःशी...

जागेपणी स्वप्न हे वाटते नकोसे,
हृदयात का हे वाढती उसासे...

हा ध्यास कोणता घेतला मनाने,
जुने स्वप्न पुन्हा उलगडे नव्याने...

का पुन्हा जागे ओढ, त्या जुन्या वाटेची,
वाटते गुणगुणावे ते जुने तराने...

हलके भासे शरीर कापसाप्रमाणे,
उडण्याचे होती भास, नभ वाटती ठेंगणे...

पण तरी अंतरी, वाटते का भीती,
होतील का हि पुरी स्वप्ने जी भाबडी
माझ्याकडे पाहात जेंव्हा
शांत निघून जातेस,
अश्रू भरल्या डोळ्यानीच
सर्व सांगून जातेस,
माझ्या प्रेमाची उणीव तुला
सतत भासवत राहील
काही क्षण का होईना पण
माझी आठवण येत राहील,
माझ सोड काही नाही
तू स्वताला जपत जा
रोज रात्री स्वप्नात मात्र
एकदा तरी येत जा,
मी आता जगतोय खरा पण
फक्त खोट्या आशेवर
तू येशील म्हणून आणखीन हि उभा आहे
तुझ्या त्याच परतीच्या वाटेवर ..........

Friday, April 1, 2011

एक होता चिमना आणि एक होती चिमणी
चिमना मोठा रुबाबदार आणि चिमणी अगदीच सुमार
तरीही एकमेकांचे जिवलग यार.

वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे,
एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .

चिमणीच्या मनात एक खुलत होते गुपित,
चिमण्या बद्दलचे प्रेम तिच्या मनाच्या कुपीत

रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना ,
त्याच्याही मनात असू देत अशाच काहीशा भावना

एक दिवस धीर करून तिने सगळे सांगितले
पण तिला त्याने अगदी सहज नाकारले

त्याला म्हणे असे काहीच वाटत नव्हते,
त्याच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते

कानाहीह्याची बरीच कारणे सांगितली
पण चिमणीच्या मनाला ती अजिबात नाही पटली

चिमणी तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडली
काय करावे कळेना,रडू तिच्याने आवरेना

चिमणीला एक उपाय सुचला , तिने चीमन्याशी अबोला धरला
चिमण्याला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला

चिमना अगदीच खुशीत होता , नवीन स्वप्ने पाहत होता
कदाचित तो थोडा जास्तच प्रक्टीकॅल होता

चिमणीने सुद्धा आता हसत जगायचे ठरवले
पण एकांतातले अश्रू तिला कधीच नाही आवरले

एकतर्फी असले तरी चिमणीचे चीमन्यावर अगदी खरे प्रेम होते

पण कदाचित खरे प्रेम चिमण्याच्या नशिबी नव्हते ...


प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत
विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत
मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित
कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच मागण असत

तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत
समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत

येणारे लोक येउन जातात
खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?


आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

एक कविता लिहीन म्हणतो,

शब्दांमध्ये मावणारी..
काळजाचा ठाव घेत मनामनाला भावणारी

रणरणत्या सिग्नलपाशी
थांबलेलं एक बालपण
..
घासासाठी कोरभर करतं रोज वणवण
..
इवलीशी पावलं.. रस्ताभर चटके

चार आण्यांचा फुटला कप,

त्याला बाराआण्यांचे फटके..
नावामागे लावायला बापाचंही नाव नाही
,
पाटी नाही, शाळा नाही, अक्षरांचा गाव नाही
.
पोट भरायला शिकताना राहून जातं शिकणं
,
भाळी येतं धक्के खाणं आणि पेपर विकणं
..
हव्याहव्याशा सुखांचा जमत नाही थाट
..
काही कळण्याआधीच लेकरू चुकतं वाट
.
त्याला पडताना सावरणारी
,
तो चुकला की कावणारी
..
आयुष्याचा ध्रुव होऊन त्याला दिशा दावणारी
..
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी
..

माथ्यावरती अठराविश्वे दारिद्र्याचा शाप
..
कितीही गाळला घाम तरी भरत नाही माप
.
कर्जाची जू ओढत उपसत बसतो कष्ट
..
सुखाचा एक ढगही साधा दिसत नाही स्पष्ट
.
पोराचं शिक्षण.. पोरींची लग्नं
..
घरदार पडलं गहाण, दुष्काळाचं विघ्न
...
आभाळभर दाटतात मग हे विषारी प्रश्न
.
कुठून आणावं आता सुख मागून उसनं
?
जड जायला लागतो रोज ताटातला घास
..
पिंपळाशी वाट बघतो.. लोंबणारा फास
.
परिस्थितीच्या वादळात

जिद्दीचं पीक लावणारी
..
शिवारभर ओसंडत त्याच्या नवसाला पावणारी
,
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी
..
पुढा-यांच्या डोळ्यांवरती हव्यासाचे पडदे
..
धर्मांधांच्या गोळ्यांखाली माणुसकीचे मुडदे
..
अमका पक्ष... तमकी सभा
,
कापाकापीला पूर्ण मुभा
..
दादांना भाईंना मंत्र्याचे छत्र
..
हप्तावसुलीला शिफारस-पत्र
.
सामान्य माणुस
?
बिशाद काय त्याची
?
रस्त्यात मेला तरी खातंय का कुत्रं
?
त्याच्या कष्टाचा पडलाय रे भाव
.
ऐतखाऊ भ्रष्टांचे शिजताहेत डाव
..
कावेबाज लांडग्याचे दिल्लीपर्यंत हात
..
फळली नाही दिल्ली तर, साला दुबईको जाव
...
मग शतमुखांचा शेष होऊन

खलांच्या टाळूस चावणारी
,
हातांमधल्या मशालींतून
क्रांतीची आग लावणारी
..
एल्गाराचा घोष बनून
नसानसांतून धावणारी
..
एक कविता लिहीन म्हणतो
,
शब्दांमध्ये मावणारी...


Monday, March 28, 2011

दोन फुलपाखरे प्रेमात पडली होती...एके दिवशी ते लपा-छपि खेळत होते, खेळताना .......


मुलगा फुलपाखरू :- चल एक छोटासा नवीन खेळ आपल्या दोघांच्यात ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!

मुलगा फुलपाखरू :- आपल्या दोघांमध्ये, सकाळी सकाळी ह्या समोरच्या फुला मध्ये जो सर्वात प्रथम बसलेला असेल तो दुसऱ्या पेक्षा जास्त प्रेम करतो ....
मुलगी फुलपाखरू :- हो चालेल !!



दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, मुलगा फुलपाखरू त्या फुलाच्या जवळ येऊन उभा राहिला आणि ते फुल उमलण्याची वाट पाहू लागला जेणेकरून तो तिच्या आधी त्या फुलामध्ये बसेल आणि तिला दाखवून देईल कि त्याचे तिच्यावर खूप खूप प्रेम आहे ....

थोड्याच वेळात फुल उमलले ........ पाहतो तर काय ????????????

.

ती मुलगी फुलपाखरू त्या उमलेल्या फुला मध्ये मरून पडली होती ........ कारण, रात्रभर ती त्या फुला मधेच राहिली होती फक्त ह्या वेड्या अपेक्षेने कि सकाळ होताच आणि ते फुल उमलताच ती त्या मुलगा फुलपाखरू कडे आनंदाने झेप घेईल आणि त्याला दाखवून देईल कि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते ते ..........

आले नभ भरुनी ..
दाटतात त्या आठवणी ..

पावसाच्या त्या थेंबात
दिसतात त्या आठवणी...

डोळ्यात अश्रू बनुनी
उभे राहतात त्या आठवणी...

दिवसाच्या त्या प्रारंभास
पहिला विचार बनतात त्या आठवणी...

रात्रीच्या त्या काळोखात
जागवतात त्या आठवणी...

कामाच्या त्या ओघात
सतावितात त्या आठवणी...

चहाच्या त्या वाफेतही
दरवळतात त्या आठवणी...

दारूच्या त्या नशेतही
धुंदावितात त्या आठवणी...

पाहत आहे वाट अजूनही तिची...
पण...आठवतात का तिला त्या आठवणी.....?
आठवतात का तिला त्या आठवणी.....
तुझ्यापासून दूर जातो
फ़क्त तुझ्यासाठीच प्रेम जाग होत
जवळ येवून जेव्हा तुझ्या बसतो
तेव्हा पवित्र मैत्रीचा स्पर्श
रोज तुझ्या डोळ्यांमध्ये पहायचो
त्या आठवनीवर दिवसरात्र रहायचो
पुन्हा नाही आपला सहवास
मैत्रीचा खुप लागला आहे ध्यास
तुझ्याविना दूरवर राहून रोजच जातो
दुखात न्हावून
मेघ पाहूनी करतो
तुझी आठवण
रिमझिम धारेत असते
माझ्या अश्रुंची साठवण
विसरु नाकोस
मला पावसात भिजुनही
मेघ पाहत आठवतो
तुला अजूनही
असेच
हे आपले मित्रत्व जपायचे

अश्रु माझे तु पावसात टीपायचे.
मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ

मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे

मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे

मैत्री म्हणजे........सल्ले घेणे

मैत्री म्हणजे........मार्ग देणे

मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग

मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी

मैत्री म्हणजे........आजचं सत्य

मैत्री म्हणजे........नसेलच नित्य

मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी...
पाहीले मी पाचोळ्याला
फांद्याना लटकून रडताना,जगताना
तर कधी फुलण्याआधी
कळी गळून पडताना
ऐन बहरात फुलांचा
रंग उडून जाताना
अन कुठे सुरकुतल्या देहातूनही उरला
गंध ओवळून टाकताना

पाहीले मी डेरेदार वृक्षाखाली
सावली हरवून जाताना
तर कुठे इवल्या रोपाखाली
वारूळ उभे रहाताना
वादळाशी झूंज देत
इतिहास नवा रचताना
तर कुणी अलवार झूळकीसरशी
मुळासकट पडताना

पाहीले मी देवळात दगडावर
अभीषेक दुधाचा होताना
तर कधी भीकार रस्त्यावर पत्थरात
अन्कुर उद्याचा फुटताना
खडकाळ बंजर जमीनीवर
नांगर यत्नाच फिरताना
तर कुठे नर्मदेच्या तीरावर
गोट्यांचे पीक येताना

पाहीले मी हिमालयाला
नतमस्तक धरेसमोर होताना
तर कधी इवल्या शीळेला
मिजास उंचीची मारताना
कुणी उगीच ढगात बोट घालून
देवांशी नाते सांगताना
तर कुठे कुण्या रामाच्या संजीवनीसाठी
भार सारा वीसरताना

पहातोय मी सचेतनात अचेतन
तितकेच भरून आहे
निर्मळ भागीरथीच्या संगे
गटारगंगा दडुन वाहे

असेच सर्व पहता पहता
डोळे क्षणभर मीटून घेतो
गोल खोल गुढ जगाची
खडकाळ रीत समजुन घेतो..............

Sunday, March 27, 2011

0kda maz Aai` tIc wa.D` zal., to tICyavr ragavUn bsla,

itne Tyala smjav~yaca qUp p/yTn kela, p` to kahI 0ekec na,

xev3I tI ragane tI hI Mh`alI, mI Aahe tr [tka ragavto Aahes

mI nsen tr

tI :- tuZya Aayu*yat mI nsen tr sa.g ksa jgxIl ?

ko`aCya Do;yat Svt:la b6xIl ?

ko`aCya Aasva.na 3IpxIl ?

ko`aCya inr4Rk gPpa.m@ye rmxIl ?

ko`aCya Ao#a.vr hasU fUlvxIl ?

ko`a.v=n im5a.m@ye mIrvxIl ?

ba{kcI magcI sI3 jeVha irkamI rahIl

smorca Aarsa hI jeVha mazI va3 pahIl

vahtUkIca go.ga3 hI jeVha xULlk va3el

tI dha imnI3e hI 0eka tpasarqI wastIl

sa.g teVha kay krxIl ?

kamat bUDvUn jrI 6exIl Svt:la

mazI Aa#v` yetac|||

moba{lvr l9 ja{l,

p` to vaj`ar nahI|||

tUla kahI trI cUkLya ckLyasarqe nKkI va3el

sa.g teVha kay krxIl|

idvswr dUs-ya.Cya ca`a9 njrepasUn lpxIl

]gac kIna-yavr mazI va3 b6xIl|||

s.@yaka;I hUrhUrxIl ||| maZya Aa#v`It becEn hoxIl

p` Algd Aaple du:q ip}n 3akxIl

mav;Tya suyaRla AapLya A&Uce A@yR de}n

gdIRthI 0k3a rahxIl|||

puNha puNha mage pahxIl|||

mI njres pD`ar nahI|||

htax ho}n jD pavla.nI pU!e calxIl|||

tU laq Svt:la smjavxIl,

du-ya.m@ye Svt:la hsvxIl,

nvIn naTya.na joDxIl|||p` qrc sa.g|||

kay mla ivs= xkxIl ???

tIc bol` 0ekUn mI jra ASvS4 zalo,9`at maza rag gayb zala

hsUn mI tIla ivcarle||| Aata tUzI pa;I|||

to :- tuZya Aayu*yat mI nsen tr|||

Aata sa.g tu kxI jgxIl ?

Hata.Cya re8a.m@ye ko`ace nav xo2xIl|||

Aarxat pahUn ko`aCya ivcarane lajxIl ?

iqDkIt lpUn ko`aCya ye~yacI va3 b6xIl ?

ko`ala AapLya gPpa.m@ye gu.tvxIl|||

0kakIp` jeVha qayala ye{l,

inrw/ Aawa; jeVha Acank w=n ye{l,

gDgDa3ane jeVha sOdaimnI grjel|||

teVha sa.g ko`ala iblgxIl ?

ca.d~yara5I A2Rc.d/ pahtana,

ko`aCya Aa#v`It g!xIl ?

suqaCya Aa#v`InehI tU,

3pore A&U pa6;xIl|||

0k3Ic Sf.udt bsxIl kItItrI ve;

mEi5`I.na 0ka mEi5`IcI go*3 sa.gtana|||

tU h;vI hoxIl||||||rDxIl|||||

Aa#vxIl fKt mla|||bakI sare ivsrxIl,

mazI ja`Iv hva tUla k=n de{l,

maza was 7aya mazI k=n de{l,

pahxIl jeVha zopa;a 0kakI zUltana,

maza Aawas Xvas tUla k=n de{l,

l9 ku#ec lag`ar nahI,c.cl mn iS4rav`ar nahI

Svt:ce A&U ksoxIne tU dDvxIl,

Mnat mla lpvUn normal jgxIl

tuZya mnaca irKtp`a ko`alahI k;`ar nahI

tU Asec idvs re3t jaxIl|||

sa.g tVha kay krxIl ?

itCya go.2;leLya ceh-yavr korlele }Ttr mla ]mgle

Aai` Aamce te wa.D` Asec iv=n gele|

¡pya Aapil p/itik/ya k;va

Aapla :

ixvm

¡pa k=n maZya kivta.cI COPPY k= nye

2Nyvad

Sunday, March 20, 2011

तु असती तर....
फार तर तुझ्यासोबत भांडलो असतो.... खुप
भांडता भांडता अचानक
काहितरी भयान शांतता झाली असती
एखाद्या खोल दरीत आवाज दिल्यावर
परत यावा...! अशी माझी नजर
तुझ्या नजरेला स्पर्शुन परत आली असती
अन् मग हळुच.... तुझ्या तळहातांवर
माझ्या ओठांनी चुंबन फुले ठेवली असती....
अन् मग नकळत.... आपलं भांडण मिटलं असतं....

तु असती तर....
आयुष्यात फार तर एक जीवन असतं
आताही आहे... पण जीव तर तुच घेऊन गेलीस
आता फक्त एक वन राहिलेलं...
संपतच नाही ....चालतो आहे कधीचा
सुर्यही उगतो तुझाच दिवस घेऊन
रात्रही माझी नाही...चंद्रही माझा नाही...
आहे माझा फक्त ... काळोख प्रत्येक रात्रीचा...

तु असती तर...
फार तर एक घरटं आपलं असतं...
त्या घरट्यामध्ये आपल्या स्वप्नांचं
तोरण मी बांधलं असतं
पण तु नाही म्हणुन काय झालं...
घरटं तर अजुनही तसच आहे ह्या मनामध्ये...
बस एक पाखरु वाट चुकून
कुठेतरी उडून गेलं... मध्येच...!!
अन् मी ही विसरून गेलो
माझ्याच घरट्याचं तुटलेलं तोरण पाहुन ...
कि हे माझचं आहे म्हणुन....
तु असती तर...
फार तर मी स्वत:ला विसरलो नसतो...

Saturday, March 19, 2011

दोन दिवसांच आयुष्य
पण फुलासारखं असावं
ऊन पावसाचे क्षण सारे
भरभरून जगावं

खुलावं चिखलातून
कधी बागेत बहरावं
सुख दु:खांच्या भ्रमरांना
कधी ओंजळीत धरावं

कधी प्रियकराच्या हातातून
प्रेयसीच्या हाती जावं
अश्या सोनेरी क्षणांचा
कधी साक्षीदार व्हावं

वधूवरांच्या सोबतीने
कधी शुभ-मंगल करावं
मनोरथ पूर्णं करण्या
चरणी ईश्वराच्याही जावं

सुखात कुणाच्या उधळावं
तर दु:खातहि सामील व्हावं
शोभून हार तुऱ्यातून
कधी सरणावरही जळावं.

दोन दिवसांच आयुष्य........
पण फुलासारखं असावं.......

रविवार सकाळची वेळ होती, मी हॉलमध्ये पेपर वाचत बसलो होतो,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
मी तिच्याकडे पाहताच "हो" म्हणालो,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेलो,
माझ्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला,
मी उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
मी हळूच उठलो खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आलो,
तिने माझ्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागलो;
तिन मात्र मागे पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि मला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत मी क्षणभर तसाच थांबलो,
उगाच तिला दुखावले म्हणून स्वतःशीच भांडलो ,
हळूच मग मागुन जाउन मग मी..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात माझा भाजला,
मी कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली,
चावटपणाची वेडी लहर माझ्या मनात मग उठली,
मी जखडले तिला मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!";
मी म्हणालो तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
मी म्हणालो "उकळू दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस मी परत आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
मी प्रत्येक कारण उडवत होतो,
तिला अजुनच जवळ घेत,
माझ्या मनासारखा घडवत होतो,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
मी म्हणालो "हो का! मला वाटले की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली ,
मी मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली,
तिन झटकन स्वतःला माझ्या तावडीतुन सोडवून घेतल,
आणि हळूच मला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
मी वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला,
माझ्या खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो पण गालात हसला,
मी कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे, अस मला वाटल,
पाहिले मला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला,
मी धावत आत गेलो, माझ ह्रदय धडधड़त होत,
माझ्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत,
मी तिला उचलून घेतल, डोळे माझे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरून हात माझे फिरत होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
मला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग विलसले,
ती म्हणाली मला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ दया ना!"
मी कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागलो,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागलो,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
आम्हा दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............