Monday, August 10, 2020

 क्षणभर.... कधी कधी वाटत एकांत असावा तर कधी अधी वाटत एकांत नसावा... क्षणभर का होईना जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक क्षण जमवत असतो.ह्रदयी साठवतो.पण कित्येकदा असं होत की त्या आठवणी ताज्यातवाण्या करतो पण तेच घालवलेले क्षण मनाला फसवून जातात, अडकवतात.त्या स्वप्नांमध्ये/भासात,सहवासात.....! . पाहिले जे स्वप्न, मनी दाटले एकांतात जणू, ह्रदयी भासले सत्य असत्यात अडकले बेफिकीर होऊनी दंगून गेले . भास हे रोजचे, पहाटे दिसे प्रकाश चांदण्यात, उजळू लागे कोरले ते चित्र आजमावते क्षणभर का होईना फुलपाखरू बनुनी झंकारते . क्षण हे कालचे, क्षण हे उद्याचे जुन्या, कोऱ्या आठवणीत रमते घटके घटकेला नवे जग नयनी पाहते क्षणभर मी मनीच गुंतून जाते

No comments:

Post a Comment